बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते बुद्धदेव दासगुप्ता यांचं निधन

कोलकत्ता | नॅशनल अवाॅर्ड विनर बंगाली चित्रपट निर्माते बुद्धदेव दासगुप्ता यांचे कोलकात्त्यात निधन झाले आहे. वयाच्या 77व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी परिवारातील एका सदस्यानं सोशल मीडियावर शेअर केली आहे.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते दासगुप्ता हे गेल्या काही दिवसांपासून एका दुर्धर आजारानं त्रस्त होते. त्यांच्या जाण्यानं अनेकांनी दुःख व्यक्त केलं आहे. त्यांच्या निधनानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोशल मीडियावर शोक व्यक्त करुन त्यांना श्रध्दांजली वाहिली आहे.

बुद्धदेव दासगुप्ता यांनी आपल्या करियरची सुरुवात लेक्‍चरर म्हणून केली होती. यानंतर त्यांनी फिल्ममेकिंग क्षेत्रात पुढे जायचे निश्‍चित केले. त्यांच्या एकूण 5 चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या श्रेणीसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

दरम्यान, बुद्धदेव दासगुप्ता हे एक कवी सुद्धा होते. त्यांना कविता लिहिण्याची प्रचंड आवड होती. त्यांनी लिहिलेल्या कविता फक्त भारतातच नाही तर परदेशातसुद्धा प्रसिद्ध झाल्या होत्या. बुद्धदेव दासगुप्ता यांच्या अनेक कविता प्रकाशित झाल्या आहेत.

 

थोडक्यात बातम्या – 

कोरोना झालेल्या मुलांना अजिबात देऊ नका ‘हे’ औषध; केंद्र सरकारने सांगितली उपचाराची योग्य पद्धत

शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतच्या बिनव्याजी कर्जासह मंत्रिमंडळाच्या बैठकीतील 6 मोठे निर्णय

धक्कादायक! कोरोनानंतर आणखी एक जीवघेणा व्हायरस आला समोर, ‘या’ ठिकाणी सापडला पहिला रुग्ण

नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर; आता मिळणार एवढ्या लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज

ग्रेट ग्रँड मस्तीमधील अभिनेत्रीने ट्रेनरचे घेतलेले पंचेस पाहून तुम्हालाही बसेल धक्का, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More