Loading...

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं आंदोलन अन् फडणवीसांनी केली मेहतांची हकालपट्टी

मुंबई |  गेल्याच आठवड्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नवनियुक्त कार्यकारणीने गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांच्या विरोधात आंदोलन केले होते. थेट मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानी ‘वर्षा’वर त्यांनी धडक मारली होती. आणि आज मंत्रीमंडळात विस्तारात मुख्यमंत्र्यांनी मेहतांना नारळ देऊन त्यांना घरचा रस्ता दाखवला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनियुक्त युवक प्रदेशाध्यक्ष आणि कार्याध्यक्षांनी पदावर नियुक्ती झाल्याच्या पहिल्याच दिवशी युवक कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी धडक दिली होती. मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली.

Loading...

गेली तीन-चार वर्ष विरोधी पक्ष सातत्याने मेहतांच्या राजीनाम्याची मागणी करत होते. परंतू गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केलेल्या आंदोलनाला मेहतांना डच्चू दिल्याने यश आल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी युवकचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख, कार्याध्यक्ष रविकांत वर्पे आणि सूरज चव्हाण यांच्यासह युवकच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.

Loading...

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या आंदोलनाचा फोटो-

महत्वाच्या बातम्या

Loading...

-मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, मोहिते पाटील आणि आमचं आधीच ठरलंय!

-रोहित शर्माने पाकला दाखवला हिसका; झळकावलं बहारदार शतक

-#IndVSPak भारताचा नवा ‘गब्बर’; शिखरची उणीव भरुन काढली!

-पाकविरुद्ध रोहित शर्माची बॅट तळपली; एवढ्या चेंडूंमध्ये झळकावलं अर्धशतक

-लांडगे-जगताप ‘वंचित’; मुख्यमंत्र्यांनी बाळा भेगडेंना दिला मंत्रिपदाचा नजराणा

 

Loading...