बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“पवार साहेबांच्या तब्येतीसंदर्भात विकृत पोस्ट करणाऱ्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”

मुंबई | राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मंगळवारी रात्री तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांना होत असलेला पोटदुखीचा त्रास वाढल्यानं ही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर काही ठिकाणी पवारांच्या आरोग्यासाठी होम हवन केलं गेलं. तर दुसरीकडे समाज माध्यमांवर पवारांच्या प्रकृतीवर अनेक प्रतिक्रिया उमटू लागल्या. अनेक जणांनी यावर चिंता व्यक्त केली होती. तर दिल्लीतील काही भाजप नेत्यांनी आणि काही नेटकऱ्यांनी शरद पवारांवर विकृत लिखाण देखील केलं होतं. त्यानंतर या विकृत लिखाणावर राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक होताना दिसत आहे.

शरद पवार यांच्या आजारपणाविषयी सोशल मीडियावर हीन दर्जाची पोस्ट करणाऱ्या विकृतांवर कारवाई केली जाणार आहे. सायबर क्राईम विभागाकडे अशा युझर्स विरोधातच तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रावादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी दिली आहे. शरद पवार यांच्यासह कोणत्याही राष्ट्रवादीच्या नेत्यावर किंवा कार्यकर्त्यांवर मर्यादा सोडून टीका केली तर ते आम्ही सहन करणार नाही, असा इशारा मेहबूब शेख यांनी दिला आहे.

शरद पवार सध्या आजारी आहेत. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्यानं त्यांना रूग्णालयात भरती करण्यात आलं होतं. ते उत्तम प्रकारे प्रतिसाद देत आहेत. ही आमच्यासाठी आणि पवारांवर प्रेम करणाऱ्या लाखो लोकांसाठी आनंदाची गोष्ट आहे. शरद पवारांच्या आजारपणानंतर अनेक काळजीचे आम्हाला फोन आले. यातून साहेबांवरचं प्रेम दिसून येतं, अशी प्रतिक्रिया मेहबूब शेख यांनी माध्यमांना बोलताना दिली.

दरम्यान, भाजप आणि त्यांच्या समर्थकांनी हद्दच पार केली. साहेबांवर केलेली टीका आमच्या जिव्हारी लागणारी होती. त्यामुळे सोशल मीडियावर टाकलेल्या विकृत पोस्टवर आयटी कलमानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. अशा लोकांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही शेख यांनी यावेळी दिला आहे.

थोडक्यात बातम्या-

केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना मोठा दिलासा; ‘हा’ निर्णय घेतला मागे

आमचा पक्ष भाजपसारखा नाही, दिलेली आश्वासने पाळण्याचा काँग्रेसचा इतिहास आहे- राहुल गांधी

“देवेंद्र फडणवीसांनी फालतू राजकारण करणं सोडून द्यायला हवं”

शरद पवारांच्या आजारपणावरून टीका करणाऱ्या भाजप नेत्यांना शंभुराज देसाईंनी झापलं, म्हणाले…

रवी शास्त्रींनी घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारींची भेट!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More