बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पेट्रोल-डिझेल पाठोपाठ नॅच्युरल गॅसच्या किंमतीतही वाढ; सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री

नवी दिल्ली | देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला आधीच कात्री लागली आहे. त्यात आता सरकारने नॅच्युरल गॅसच्या किमतीही वाढवल्या आहेत. नॅच्युरल गॅसच्या किमतीत 62 टक्क्यांनी वाढ करणार असल्याची घोषणा सरकारनं केली होती. त्यानुसार सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ झाली आहे.

सोमवारी एमएनजीएल अर्थात महानगर गॅस लिमीटेडने सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत 2 रूपयांची तात्काळ प्रभावाने वाढ केली. एमजीएलने एका निवेदनात दिलेल्या माहितीनुसार सीएनजीची किंमत 2 रुपये प्रति किलो तर पीनजीची किंमत देखील 2 रुपये प्रति एससीएमने वाढली आहे.

नॅच्युरल गॅसला जगभरातून मोठी मागणी आहे. त्यात कोळशाच्या किंमतीतही वाढ झाली आहे. एकीकडे चीनमध्ये नॅच्युरल गॅसच्या आयातीत दुपटीने वाढ झाली आहे, तर अमेरिकेत होणाऱ्या नॅचरल गॅसच्या उत्पादनात घट झाली आहे. आधी दर आठवड्याला 52बीसीएफ गॅसचं उत्पादन होत होतं. पण आता घट होत गॅस उत्पादन 46 बीसीएफ प्रति आठवड्यावर आलं आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर नॅच्युरल गॅसच्या किंमतीत वाढ होत आहे.

ही दरवाढ झाल्यानंतर मुंबई आणि आजूबाजूच्या भागात सीएनजी आणि पीएनजीचे टॅक्ससह भाव हे स्लॅब 1 मधील ग्राहकांसाठी सीएनजी 54.57 रुपये किलोग्रॅम तर पीएनजी 32.67 रुपये एससीएम आहे. तर स्लॅब 2 मधील ग्राहकांसाठी पीएनजीची किंमत 38.27 रुपये एससीएम आहे. नॅच्युरल गॅसच्या दरात होत असलेल्या वाढीने घरगुती बाजारावर मात्र परिणाम होत आहे.

 

थोडक्यात बातम्या-

दिलासादायक! देशातील नव्या कोरोना रूग्णसंख्येत 209 दिवसातील निच्चांकी नोंद

…म्हणून जगभरातील फेसबुक सर्व्हर झालं होतं ठप्प; तब्बल एवढ्या हजार कोटींचं नुकसान

“त्याच्या मुलाच्या अटकेवर थोडीतरी सहानुभूती दाखवा”

आता विदर्भातील ‘या’ शहरात होणार नवं विमानतळ; पुढच्याच वर्षी होणार प्रवासी वाहतूक

लखीमपूरच्या ‘त्या’ घटनेचा व्हिडीओ आला समोर; संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More