बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाराष्ट्रातील ‘या’ शहरात एका दिवसात आढळले फक्त 94 कोरोनाबाधित रुग्ण

नवी मुंबई | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत होती. वाढत्या रूग्णसंख्येमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात लाॅकडाऊन घोषित केला. तसेच हा लॉकडाऊन 1 जून पर्यंत लागू करण्यात आला आहे. लॉकडाऊन घोषित केल्यानंतर काही दिवसांनी लाॅकडाऊनचा सकारात्मक परिणाम होत असताना पाहायला मिळत आहे.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या विविध भागातून कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्याचं दिलासादायक चित्र दिसून येत आहे. वाढती रुग्णसंख्या हा चिंतेचा विषय बनला असतानाच महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट होत आहे. नवी मुंबईमध्ये काल दिवसभरात फक्त 94 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तसेच 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

नवी मुंबईतील मृत्यूदर नियंत्रणात आल्याचं दिलासादायक चित्र पाहायला मिळत आहे. 2021 मध्ये 5 महिन्याच्या कालावधीत नवी मुंबईमध्ये तब्बल 45 हजार 766 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. पहिल्या लाटेत नवी मुंबईतील मृत्यूदर 2.4 टक्के होता. परंतु या लाटेमध्ये 1.4 टक्के मृत्युदर असल्याचं समोर आलं आहे.

नवी मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होऊन नव्या कोरोनाबाधितांची संख्या शंभरच्या आत आल्याने काही प्रमाणात दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर, शहरातील क्रिटिकल रुग्णांची संख्या 550 वरून 70 वर आली आहे.

थोडक्यात बातम्या –

दिलासादायक! महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांसह मृतांच्या संख्येतही घट, जाणुन घ्या आकडेवारी

मुंबईत आमदाराच्या पत्नीनं आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं खळबळ, ‘हे’ दिलं कारण!

काळजाचा थरकाप उडवणारी घटना! बापानेच अल्पवयीन मुलांच्या डोक्यात दगड घालून केली हत्या त्यानंतर…

भारताचा सर्वात जवळचा मित्र असलेल्या ‘या’ देशाला मुंबई महापालिकेचं लसींसाठी साकडं

संजय राऊतांना काही कामधंदा नाही- देवेंद्र फडणवीस

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More