“काँग्रेस नेत्यांचं डोकं ठिकाणावर आहे का?”; या उमेदवारीवरुन मोठा वाद

मुंबई | रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसनं उमेदवारी दिलेल्या नवीनचंद्र बांदिवडेकरांना विरोध होताना दिसतोय. सोशल मीडियात यासंदर्भात पोस्ट पहायला मिळत आहेत.

नालासोपाऱ्यात सनातनच्या वैभव राऊतच्या घरी शस्त्रास्त्रं सापडली होती. या वैभव राऊतच्या समर्थनार्थ बांदिवडेकर उभे राहिले होते.

सनातनच्या साधकाच्या घातक कारवायांचं समर्थन करणाऱ्या व्यक्तीला काँग्रेसनं उमेदवारी दिल्यानं संताप व्यक्त केला जातोय.

दरम्यान, काँग्रेसचे नेते तसेच पदाधिकारीसुद्धा बांदिवडेकर यांच्या उमेदवारीवर संतप्त असल्याचं कळतंय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या ही बाब निदर्शनास आणून हा उमेदवार बदलण्याची मागणी करण्यात येणार असल्याचं कळतंय.   

  

महत्वाच्या बातम्या-

“येणारा आठवडा राजकीय घडामोडींनी गाजणार, निवडणूक ही फक्त औपचारिकता”

भाजपची आज पहिली यादी जाहीर होणार, महाराष्ट्रातून ‘यांची’ नाव असण्याची दाट शक्यता

भाजपचे व्यंगचित्रातून पवार घराण्यावर बोचरे वार

भाजपचं कमळ हाती घेणार का? काँग्रेस नेते हर्षवर्धन पाटील म्हणतात…

राष्ट्रवादीने तुम्हाला उमेदवारी देऊन कर्डिलेंची गोची केलीय का? संग्राम जगताप म्हणतात…