बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत…’; नवज्योत सिंग सिद्धूंचं मोठं वक्तव्य!

नवी दिल्ली | कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे पंजाबच्या राजकारणात खळबळ उडाली. त्यानंतर पंजाब काॅंग्रेसने चरणजीत सिंग चन्नी यांची मुख्यमंत्री म्हणून निवड केली. अमरिंदर सिंग यांच्याविरोधात बंडखोरी करूनही नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाब काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मी गांधीजी आणि शास्त्रीजींच्या तत्त्वांचे कायम पालन करेन. तसेच मी पक्षात कोणत्याही पदावर असो अथवा नसो, मी कायम राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत उभा राहीन. सर्व नकारात्मक शक्तींना मला पराभूत करण्याचा जेवढा प्रयत्न करायचा आहे, तेवढा करू द्या. परंतु सकारात्मक ऊर्जेच्या प्रत्येक छोट्या प्रयत्नाने पंजाब जिंकेल. पंजाबियत जिंकेल आणि प्रत्येक पंजाबी जिंकेल, असं सिद्धू म्हणाले.

तडजोडी करण्यापासून माणसाचे चारित्र्य ढासळण्यास सुरूवात होते. मी पंजाबे भवितव्य आणि पंजाबच्या कल्याणासाठीच्या योजना यावर तडजोड करणार नाही. त्यामुळे मी पंजाबच्या प्रदेश काॅंग्रेस समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहे, असं  नवज्योत सिंग सिद्धू यांनी पदाचा राजीनामा देत काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना पाठवलेल्या पत्रात म्हटलं होतं.

दरम्यान, पूढील वर्षी पंजाबमध्ये विधानसभेसाठी निवडणुका होत आहेत. त्यामुळे पंजाबच्या राजकारणात मागील काही दिवसापासून अनेक घडामोडी घडताना दिसत आहे.

 

 

थोडक्यात बातम्या-

‘ते शिवसेनेत, मी काॅंग्रेसमध्ये आहे मग…’; साबणेंच्या आरोपावर अशोक चव्हाणांचं प्रत्युत्तर!

पश्चिम बंगालमधील पोटनिवडणुकीत ममता बॅनर्जींचा मोठ्या मताधिक्याने विजय!

शाहरुखच्या मुलाला ताब्यात घेतल्यानंतर सचिन वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

शाहरुखच म्हणाला होता, “माझ्या मुलानं ड्रग्ज घ्यावेत, पोरींच्या मागं जावं, सेक्स करावा”

ठाकरे सरकार गप्प का बसलंय, भूमिका घ्यायला हवी- संजय राऊत

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More