बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवनीत राणांचा विनामास्क आदिवासींसोबत डान्स, पाहा व्हिडीओ

अमरावती | राज्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने राज्य सरकारने अनेक नियम लागू केले आहेत. तसेच जर हे नियम पाळले नाहीत तर दंड देखील आकरण्यात येत आहे. अशातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी होळीच्या दिवशी कोरोनाच्या नियमांची होळी केल्याचं दिसून येत आहे.

अमरावतीमधील मेळघाट येथे नवनीत राणा आणि रवी राणा यांनी होळी समारंभासाठी आपली उपस्थिती लावली. या दरम्यान नवनीत राणा यांनी आदिवासी महिलांसोबत नृत्याचा ठेका धरला. हा व्हिडीओ आता सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत असून ते दोघे आपली 11 वर्षांची परंपरा निभवत असल्याचं रवी राणा यांनी म्हटलं आहे.

आयोजित करण्यात आलेल्या होळी समारंभात अनेक लोकांनी मास्क घातले होते. मात्र डान्स करत असताना नवनीत राणा यांनी मास्क घातलेला नव्हता. तसेच रवी राणा आणि नवनीत राणा यांनी अदिवासी बालकांसोबत क्रिकेट खेळून मनसोक्त आनंद लुटला. मात्र या समारंभात सोशल डस्टंसिंगचं देखील उल्लंघन करण्यात आलं आहे.

दरम्यान, राज्य सरकारचे नियम न पाळ्यास सर्वसामन्यांनी दंड भरायचा आणि खासदार विनामास्क डान्स करतात. याचा अर्थ नियम फक्त सर्वसाम्यांनान असून खासदारांना नसतात का?, असा सवाल केला जात आहे.

थोडक्यात बातम्या-

महावितरणची थकबाकी हे भाजपचंच पाप आहे- नितीन राऊत

मोदींनी आदेश दिल्यास माझी ममतांच्या विरोधातही लढायची तयारी – मिथुन चक्रवर्ती

माजी IPS संजीव भट्ट यांच्या पत्नीची भावनिक साद, म्हणाल्या…

‘तुझ्या बॅटमध्ये स्प्रिंग आहेत का?’; षटकार मारल्यावर स्टोक्सनं शार्दुलची बॅट तपासली

‘ही’ प्रसिद्ध गायिका लवकरच करणार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश!

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More