बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवनीत राणांनी साजरी केली करवाचौथ! खास फोटोज सोशल मीडियावर व्हायरल

अमरावती | खासदार नवनीत कौर राणा यांनी पती आमदार रवी राणा यांच्यासाठी करवाचौथचं व्रत केलं. नवनीत राणांनी मोठ्या उत्साहात करवाचौथ साजरी केली आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांचे करवाचौथचे खास फोटोज सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

 

राजस्थान, पंजाब, उत्तर प्रदेश, गुजरात, हरियाणा, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश या भागात प्रामुख्याने करवाचौथ हा पारंपारिक सण साजरा केला जातो. तर खासदार नवनीत राणा यांनीही मोठ्या उत्साहात करवाचौथ साजरी केली आहे.

 

दरवर्षी कार्तिक महिन्याच्या चतुर्थीला करवाचौथ साजरी केली जाते. सर्व विवाहीत महिला आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. खासदार नवनीत राणाही दरवर्षी पती रवी राणांच्या दिर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. यंदाही त्यांनी हे व्रत पूर्ण केलं.

 

सुर्योदय होण्याआधी भगवान शंकराची उपासना आणि सुर्याला जलअर्घ्य देऊन धरलेला उपवास संध्याकाळी चंद्रदर्शन आणि नंतर पतीचे मुखदर्शन करून सोडला जातो. नवनीत राणा यांनीही पारंपारिक पद्धतीने आधी चंद्राचं आणि मग पती रवी राणा यांचं चाळणीच्या माध्यमातून मुखदर्शन घेऊन त्यांचा आशिर्वाद घेतला.

 

पती रवी राणा यांच्या हाताने पाणी पिऊन नवनीत राणा यांनी त्यांचा उपवास सोडला. संपुर्ण साजश्रृंगारासह नवनीत राणा यांनी पती आमदार रवी राणा यांच्यासह हे पारंपारिक व्रत मोठ्या आनंदाने पुर्ण केलं.

 

थोडक्यात बातम्या- 

‘पाकिस्तानविरुद्ध आपण कधी ना कधी हरणार’, धोनीची ‘ती’ भविष्यवाणी खरी ठरली

समीर वानखेडेंवरील आरोपांच्या चौकशीला सुरूवात; वानखेडे दिल्लीला जाण्याची शक्यता

“यांच्या बायकोने मारलं तरी सांगतील की, केंद्र सरकारचा हात आहे”

एलपीजी गॅस वापरताय तर तुम्हालाही मिळणार 50 लाखांचा विमा, कसं ते वाचा सविस्तर

“मोदी सरकारनं लसीकरणाची शंभरी साजरी केली, आता इंधन दरवाढीचीही शंभरी साजरी करावी”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More