बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मुख्यमंत्री लायक असते तर…’; नवनीत राणांची जहरी टीका

नवी दिल्ली | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावरून खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री लायक असते तर इथं येण्याची गरज नव्हती. आईबाप हे मुलांसाठी कधी रडत नसतात. उद्धव ठाकरे यांना विविध विषयांच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांना भेटायचे होते. ही संधी त्यांनी साधली, अशी टीका नवनीत राणा यांनी केली आहे. त्या दिल्लीत माध्यमांशी बोलत होत्या. यावेळी त्यांनी उच्च न्यायालयात जात प्रमाणपत्र रद्द झाल्याच्या निकालावर देखील प्रतिक्रिया दिली आहे.

अमरावतीच्या जनतेने ज्यांना पराभूत केले ते उत्साहाच्या भरात न्यायालयात गेले. आता मला भविष्यात सर्वोच्च न्यायालयाकडून न्यायाची अपेक्षा आहे. मी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करते. माझी शिवसेनेसोबतची राजकीय लढाई सुरु राहील, असं नवनीत राणा यांनी सांगितलं.

मी अनेकांना मदतीचा हात दिला, अमरावती जिल्ह्याच्या विकासात शून्य योगदान असणारे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी जिल्ह्याच्या विकासाच्या आड येऊन एक महिला म्हणून मला त्रास देण्याचं, जिल्ह्याच्या विकासाला बाधा आणण्याचं व माझं खच्चीकरण करण्याचं काम केलं असून हे एक राजकीय षडयंत्र आहे. मी संघर्ष करणारी महिला आहे त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा अंतिम असेल आणि तेथे सत्याचाच विजय होईल, असा विश्वास नवनीत राणा यांनी व्यक्त केला.

थोडक्यात बातम्या- 

अनेक दिग्गज मंत्र्यासोबत काम करणारे विशेष अधिकारी राम खेडेकर यांचं निधन

संतापजनक! इन्स्टाग्राम स्टिकरमध्ये शिवशंकरांच्या हातात वाईनचा ग्लास, इन्स्टाग्रामविरूद्ध तक्रार दाखल

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! फक्त ‘एवढ्या’ दिवसांत तब्बल 53 हजार रूग्ण कोरोनामुक्त

‘मुंबई पुण्याला तिसऱ्या लाटेचा धोका नाही’; तज्ज्ञांनी सांगितलं ‘हे’ मोठं कारण

डाळिंब निर्यातीवर लॉकडाऊनची कुऱ्हाड; कोट्यवधींची उलाढाल ठप्प

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More