अमरावती महाराष्ट्र

संजय राऊत यांनी काय महाराष्ट्राचा ठेका घेतला आहे का?- नवनीत राणा

अमरावती | कंगणा राणावतच्या कार्यालयावर आज मुंबई महापालिकेने कारवाई केली. यावर प्रतिक्रिया देत खासदार नवनीत राणा यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. राऊतांचा खासदारकीचा राजीमाना घ्यावा, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.

संजय राऊत यांनी काय महाराष्ट्र राज्याचा ठेका घेतला आहे का?, ते नेहमी महिलांचा अपमान करत असतात. राऊत तुम्ही आपली मर्यादा सांभाळा, असा इशारा नवनीत राणा यांनी दिला आहे.

राज्य सरकार सत्तेचा दुरूउपयोग करत असून मुंबई महापालिकेने अभिनेत्री कंगणा राणावतच्या कार्यालयावर केलेली कारवाई ही चुकीची असल्याचं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात वाढत असून भंडारा-गोंदियामध्ये तर पूर आला मात्र मुख्यमंत्री तिकडे गेले नाहीत त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आतातरी मातोश्रीबाहेर पडा, असा टोलाही राणा यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या-

पुढील अधिवेशन मातोश्रीच्या गच्चीवर घ्या, नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

अधिकाऱ्याची गाडी फोडल्याप्रकरणी मनसे नगरसेवक वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल!

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई द्या- सुप्रिया सुळे

भारतात PUBG गेम पुन्हा येणार?; कंपनीने घेतला मोठा निर्णय

ठाकरे सरकारला मराठा आरक्षण कायम राखता आलं असतं पण…- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या