Top News

‘जमत नसेल तर…’; नवनीत राणा यांचं ठाकरे सरकारवर टीकास्त्र

अमरावती | औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी सरकारमधील मतभेद पुन्हा समोर आले आहेत. यावरून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी ठाकरे सरकावर जोरदार टीका केली आहे. घरात जसं जावा आणि दिराचं भांडण असतं तसं सरकारचं सुरू आहे. जबरदस्तीने सरकारमध्ये राहणं आणि विचार न पटणं अशी अवस्था त्यांची झाली आहे, हे लोकांना स्पष्ट दिसत आहे, असं म्हणत नवनीत राणा यांनी सरकारवर निशाणा साधलाय.

विचार जमत नसताना शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष यांची युती झाली आहे. त्यामुळे विचार जमत नसेल तर तुम्ही एकमेकांना सोडा, असा सल्ला खासदार नवनीत राणा यांनी महाविकास आघाडीला दिला आहे.

औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर करण्याच्या शिवसेनेच्या भूमिकेला काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. आमच्यासाठी लोकांचा विकास महत्त्वाचा असून नाव बदल्याने विकास होत नाही, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसने औरंगाबादच्या नामांतराला विरोध केल्यानंतर भाजपनेही शिवसेनेला कोंडीत पकडत टीकास्त्र सोडलं.

थोडक्यात बातम्या-

खळबळजनक! मुंबईत थर्टी फर्स्टच्या पार्टीत तरुणीची हत्या; हत्येचं कारण ऐकून सुन्न व्हाल

‘4 जानेवारीला ठोस निर्णय घ्या, अन्यथा…’; शेतकऱ्यांचा केंद्राला इशारा

“भाजपवाल्यांनी चिंतातुर जंतूप्रमाणे उगाच वळवळ करू नये”

“बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचं नामांतर तीस वर्षांपूर्वीच केलं”

कंगणा राणावतच्या अडचणीत वाढ; कंगणाची ‘ती’ याचिका न्यायालयाने फेटाळली

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या