बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा’; नवनीत राणांचं अमित शहांना पत्र

मुंबई | महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केली आहे. त्यांनी या संदर्भात गृहमंत्री अमित शहांना एक पत्र लिहिलं आहे.

अंबानी यांच्या घरासमोर स्फोटक सापडल्याचा आणि मनसुख हिरेन प्रकरणाचा उल्लेख नवनीत राणांनी या पत्रात केला आहे. या संपूर्ण प्रकरणाच्या घटनाक्रमाचा उल्लेख करत या संपूर्ण प्रकरणाची एनआयएमार्फत चौकशी करण्याची आणि राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी नवनीत राणांनी केली आहे.

मनसुख हिरेन चौकशीला सहकार्य करत होते. त्यांना गुन्हेगारासारखी वागणूक दिली जात होती. त्याबाबत हिरने यांनी ठाकरे सरकारकडे तक्रारही केली होती. तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांना संरक्षण देण्याची मागणीही केली होती. मात्र त्यानंतर हिरेन यांचा मृत्यू झाला, अशी माहिती नवनीत राणा यांनी या पत्रातून दिली आहे.

दरम्यान, नारायण राणे यांनीही पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझेप्रकरणावरून ठाकरे सरकारवर सडकून टीका केली होती. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात यावी, अशी मागणी केली होती. तसेच आज कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. कुणाला कधी काय होईल याची काही शाश्वती राहिली नाही. विकास नाही आणि पण भ्रष्टाचार वाढला आहे. त्यामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी अमित शहा यांच्याकडे करण्यात आल्याचं राणे म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या- 

लॉकडाऊनबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

तरूणाला खुलेआम प्रपोज करणं ‘तिला’ पडलं चांगलंच महागात, पाहा व्हिडिओ!

पवारसाहेब जाणते राजे, मुंबई पोलिसांची नाचक्की करणाऱ्या गृहमंत्र्यांना हटवा- प्रसाद लाड

सचिन वाझेंची प्रकृती खालावली; उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात हलवलं

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठी खलबतं; ‘या’ बड्या नेत्याचं मंत्रिपद जाणार?

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More