बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नवनीत राणांची पुन्हा नवी घोषणा, म्हणाल्या…

नवी दिल्ली | खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) यांची नुकतीच तुरुंगातून सुटका झाली आहे. आज राणा दाम्पत्यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत आघाडी सरकारला चांगलंच धारेवर धरल्याचं दिसलं. त्याचबरोबर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष केलं.

उद्धव ठाकरेंच्या मुंबईतील 14 तारखेच्या सभेदिवशी दिल्लीतील कॅनोट प्लेस येथील संकट मोचन हनुमान मंदिरात जाऊन आरती करणार असल्याची घोषणा, नवनीत राणांनी आजच्या पत्रकार परिषदेतून केली आहे.

नवनीत राणांच्या या घोषणेनं पुन्हा एकदा खळबळ माजवली आहे. नवनीत राणांच्या या घोषणेनं शिवसैनिक कमालीचे आक्रमक झालेले पहायला मिळाले.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निवडणुकीच्या मैदानात उतरुन निवडणूक लढतील काय? हा माझा त्यांना सवाल आहे. मुख्यमंत्र्यांनी 14 तारखेच्या मुंबईच्या सभेत माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावं, असं आवाहन नवनीत राणांनी केलं आहे.

थो़डक्यात बातम्या – 

“आम्ही घाबरणारे नाहीत तर…”; नवनीत राणा आक्रमक

“राज ठाकरेंच्या केसालाही धक्का लागला तर…”; मनसेचा गंभीर इशारा

मोठी बातमी! एमपीएससीकडून ‘इतक्या’ पदांसाठी भरती

‘त्या 28 भाजप नेत्यांची प्रकरणं उघड करणार’; संजय राऊतांचा गंभीर इशारा

राजद्रोहाच्या खटल्याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More