बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘नवाब मलिक हे पाकिस्तानचे एजंट’; नितेश राणेंचा मलिकांवर हल्लाबोल

मुंबई | गेल्या काही दिवासांपासून राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबी विरूद्ध मोर्चा उघडला आहे. शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक झाल्यानंतर त्यांनी एनसीबीविरूद्ध आक्रमक भूमिका एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. अशातच आता या प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांनी नवाब मलिकांवर टीका केली आहे.

अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे पाकिस्तानच्या ड्रग्ज माफियांचे बँड अॅम्बेसेडर आहेत. ते पाकिस्तानचे एजंट आहेत. त्यांच्यामुळे अनेक पिढ्या खराब होणार आहे. पाकिस्तानातून येणारे ड्रग्ज संपुर्ण महाराष्ट्रात व्यवस्थितपणे पोहचवला पाहिजे यासाठी ते काम करतात, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.

नवाब मलिक एनसीबीला बदनाम करण्याचं काम करतायेत. त्यामुळे राज्यातील ड्रग्ज माफियांची हिंमत वाढत आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना समीर वानखेडे यांना धमकी दिली जात आहे. मात्र, यावर शिवसेनेचा एकही नेता बोलला नाही, त्यामुळे शिवसेनेची मराठी अस्मिता कुठे गेली, असा प्रश्न उपस्थित होतोय, असंही नितेश राणे म्हणाले आहेत.

दरम्यान, स्वत:ला मराठी माणसांची संघटना सांगताना शिवसेनेला लाज वाटली पाहिजे. नवाब मलिक रोज उठून समीर वानखेडे यांना बदनाम करतात, यावर शिवसेनेचे नेते बोलत नाही. खरंतर संजय राऊतांनी नवाब मलिकांना हिंदुत्व आणि मराठी अस्मितेचे धडे देयला पाहिजे, असंही नितेश राणे म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

थायरॉइडमुळे त्रस्त आहात?; आहारात करा ‘या’ 6 गोष्टींचा समावेश

‘हिंमत असेल तर औरंगाबादचं नाव बदलून दाखवाच’; इम्तियाज जलील यांचं थेट आव्हान

ऑस्ट्रेलियाची विजयी सलामी! दक्षिण आफ्रिकेचा 5 गडी राखून पराभव

‘सितारों से आगे जहाँ और भी हैं’; नवाब मलिकांचा शायरीतूून टोला

घटस्फोटानंतर समंथाने केलं तिचं स्वप्न पुर्ण, फोटो शेअर करत म्हणाली…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More