Top News विधानसभा निवडणूक 2019

मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार- नवाब मलिक

मुंबई | मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरच शिवसेना वेगळी झाली आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान राखणं आणि त्यांचा स्वाभिमान जिवंत ठेवणं ही आता आमची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री शिवसेनेचाच होईल, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. ते TV9 शी बोलत होते.

मुख्यमंत्रिपदावरून शिवसेनेने भाजपशी काडीमोड केला. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जात शिवसेना सत्तास्थापन करू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आता आघाडी शिवसेनेला मुख्यमंत्रिपद देणार का? हा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे. त्यावरच नवाब मलिक यांनी प्रकाश टाकला आहे.

उपमुख्यमंत्रिपदाबाबत अद्याप चर्चा झालेली नाही. काँग्रेसने सत्तेत यावं, अशी आमची इच्छा आहे. पण त्यांना बाहेरुन पाठिंबा द्यायचा आहे.  पद, खाती याबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही. आम्ही सगळे एकत्र बसून लवकरच याबाबत चर्चा करू, असंही मलिक म्हणाले.

दरम्यान, मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे असेल, हे आता निश्चित झालं. मात्र इतर मंत्रिपदांचं वाटप कसं होतं? हे पाहणं महत्वाचं आहे.

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या