पुणे महाराष्ट्र

“बारामतीसाठी आधी उमेदवार द्या, मग बारामती जिंकण्याची भाषा करा”

पुणे | बारामती लोकसभा मतदारसंघासाठी आधी उमेदवार द्या, मग बारामती जिंकण्याची भाषा करा, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपवर टीका केली आहे.

मागच्यावेळी 42 जागा जिंकल्या, यावेळी 43 जागा जिंकणार आणि ती 43 वी जागा बारामतीची असेल, असा दावा मुख्यमंत्र्यांनी पुण्यात बोलताना केला होता. यावर त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

बारामतीला भाजपचा उमेदवार कोण? नरेंद्र मोदी, अमित शाह की देवेंद्र फडणवीस? हे आधी जाहीर करा, असं आव्हान त्यांनी केलं आहे.

मलिक यांनी भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यावरही टीका केली आहे. शहा 48 पैकी 45 जागा निवडून आणू बोलले हे बरं, नाहीतर ते 50 सांगायलाही कमी करणार नाहीत, असं ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

संतापजनक! सरकारवर टीका केली म्हणून अमोल पालेकरांचं भाषण अर्ध्यावरच थांबवलं

अन्नत्याग करणाऱ्या कृषीकन्यांची राधाकृष्ण विखे पाटलांवर झहरी टीका

-बारामतीसह 43 जागा जिंकण्यासाठी देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा-शरद पवार

-गोगावले पुण्याचे पालकमंत्री तर अमित शहा पंतप्रधान, रावसाहेब दानवेंचा ‘गोंधळचं गोंधळ’!

-मुख्यमंत्र्यांची ‘बारामती’ जिंकण्याची वल्गणा, राष्ट्रवादीला झाली बेडकाच्या गोष्टीची आठवण!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या