महाराष्ट्र मुंबई

“दिल्लीतील हिंसा हा शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा भाजपचा कट”

मुंबई | दिल्लीतील हिंसा हा शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा भाजपचा सुनियोजित कट होता, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

लाल किल्ल्याच्या दिशेने शेतकऱ्यांची रॅली गेली होती. पोलिसांनीच त्यांना लाल किल्ल्याचा मार्ग दाखवला होता. तिथे ध्वज फडकवण्याचं काम भाजपशी संबंधित दीपसिंह सिद्धूने केली. याच दीपसिंह सिद्धूने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती, असं नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.

दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांनी ट्रॅक्टर मोर्चा काढणार असल्याचंही स्पष्ट केलं होतं. हा मोर्चा दिल्लीत आला. त्यांनी लाल किल्ल्यावर ध्वज फडकवला. पण तिरंगा काढून त्यांनी ध्वज फडकवला ही बातमी चुकीची आहे, असं नवाब मलिक म्हणाले.

शरद पवार हे जवानांच्या बाजूने उभे आहेत. दिल्ली पोलीस दलात पंजाब, हरियाणाचे लोक आहेत, हे आशिष शेलार यांना माहीत नाही काय?, असा सवाल नवाब मलिक यांनी केलाय.

थोडक्यात बातम्या-

दिल्लीत हिंसाचार करणारे शेतकरी नाहीत, ते तर देशद्रोही- सदाभाऊ खोत

“शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत केंद्र सरकार उदासीन असून ते शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे”

कर्नाटक व्याप्त भूभाग केंद्रशासित घोषित करा- उद्धव ठाकरे

कर्तृत्वाला मिळाली नशिबाची साथ; सर्वात कमी वयाचा सरपंच होण्याचा मार्ग मोकळा!

आशिष शेलार भाजप आणि संघाचे गुलाम- अमोल मिटकरी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या