मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक पार पडली. यावेळी मोदींनी 16 तारखेपासून भारतात लसीकरणाला सुरुवात होणार असल्याचं सांगितंल आहे. मात्र अशातच राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी लसीबाबत शंका व्यक्त केली आहे.
सुरक्षिततेविषयी अद्याप काही शंका आहेत. या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वप्रथम लस टोचून घ्यावी, असं वाब मलिक यांनी म्हटलं आहे.
कोवॅक्सिनचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलही पूर्ण झालं असून आणि भारतासाठी ही खूप अभिमानास्पद बाब आहे. भारत बायोटेकनं तयार केलेली कोरोना लस कोवॅक्सिनचं तिसऱ्या टप्प्यातील ट्रायल यशस्वीरित्या पूर्ण झाली असल्याची माहिती भारत बायोटेकनं दिली आहे.
दरम्यान, नवाब मलिकांच्या या वक्तव्यावर भाजप नेते काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
थोडक्यात बातम्या-
‘आज मला पाकिस्तानला हरवल्यासारखं वाटलं’; भारतीय संघातील ‘या’ शिलेदाराची प्रतिक्रिया
प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे निष्पाप बालकांचा नाहक जीव गेला- देवेंद्र फडणवीस
‘योगी की मौत सुनिश्चित हैं’; आपच्या आमदाराचं वक्तव्य, पाहा व्हिडीओ
ग्वाल्हेरमध्ये हिंदू महासभेने सुरू केली गोडसे ज्ञानशाळा!
“…तर त्यांना ईडीच्या कार्यालयासमोर जोड्याने मारलं नाही तर माझं नाव संजय राऊत नाही”