Top News महाराष्ट्र मुंबई

“ईडीला आता कुणी घाबरत नाही, शरद पवार आणि ठाकरेंना नोटीस आली पुढे काय झालं?”

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांना दोन दिवसांपुर्वी ईडीची नोटीस आली होती. अशातच आज शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीची नोटीस आली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते नबाव मलिक यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

ईडीच्या कामकाजात केंद्राचा हस्तक्षेप असल्याचं दिसून येतं आहे. पण आता ईडीला कुणीही भीत नाही, असं नबाव मलिक यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाशी ते बोलत होते.

अनेक नेत्यांना ईडीच्या नोटीस पाठविण्यात आल्या आहेत. पवार साहेबांना नोटीस पाठवण्यात आली होती. पुढे काय झालं. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनाही ईडीची नोटीस पाठवली होती, पण पुढे काय झाल?, असा सवाल मलिकांनी केला.

दरम्यान, ईडीकडून नोटीस पाठविण्यात येते, दोन दिवस चर्चा होते, संबंधित नेत्याची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रयत्न असल्याचं मलिकांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“कुणालाही ईडीची नोटीस मिळाली की भाजपला समोर केलं जातं”

“मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची मागणी सर्वात आधी माझ्या पक्षाने केली”

प्रसिद्ध सराफी व्यावसायिक मिलिंद मराठे यांचं निधन; आत्महत्येचा केला होता प्रयत्न

बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली उतरणार राजकारणात?

पत्नीला मिळालेल्या ईडीच्या नोटीसनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या