बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“‘या’ राज्यातील भाजपचं सरकार जाणार हे नक्की”

मुंबई | उत्तर प्रदेश राज्यातील भाजपचं सरकार जाणार असल्याचा वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते आणि मंंत्री नवाब मलिक यांनी केलं आहे. शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीवरही आपलं मत मांडलं.

केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळात फेरबदल करण्याच्या बातम्यांनी जोर धरला आहे. फेरबदल करायचा की नाही हा अधिकार पंतप्रधानांचा आहे. उत्तरप्रदेशच्या मंत्रिमंडळात योगीजी बदल करतील किंवा नाही  तो त्यांचा अधिकार आहे. मात्र यावेळी जनतेने बदल करण्याचा विचार पक्का केला असल्याचं नवाब मलिक केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची कोणतीही जबाबदारी राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्याकडे देण्यात आलेली नाही. प्रशांत किशोर हे राजकीय रणनीतीकार आहेत. त्यांचा वेगळा अनुभव आहे. तो अनुभव आणि देशात राजकीय परिस्थिती काय आहे याची माहिती प्रशांत किशोर यांनी शरद पवारांना दिली असल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलं.

दरम्यान, नवाब मलिकांच्या या वक्तव्यावर भाजपचे नेते काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. केंद्राच्या किंवा उत्तरप्रदेशमधील मंत्रिमंडळात बदल होणार असल्याचं बोललं जात आहे.

थोडक्यात बातम्या- 

‘या’ शहरातील कोरोना आला आटोक्यात; सक्रिय रुग्णसंख्येत लक्षणीय घट

“उद्धव ठाकरे दिल्लीतून हात हलवत आले, मुख्यमंत्र्यांच्या मनात पाप”

केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता; महाराष्ट्रातून कोणाची वर्णी लागणार?

“संभाजीराजे छत्रपती हे मान्य करत नसले तरी ऑन पेपर ते भाजपचेच खासदार”

‘या’ एका व्यक्तीनं तयार केली मॅच विनर्सची फौज; बदलली आहे टीम इंडिया

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More