बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

समीर वानखेडेंचा आणखी एक जुना फोटो शेअर करत मलिक म्हणतात, मला तर…

मुंबई | आर्यन खान प्रकरणापासून अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक विरूद्ध एनसीबी मुंबईचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यात चांगलाच वाद पेटला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा वाद दिवसेंदिवस वाढतच आहे. तर नवाब मलिकांकडून समीर वानखेडेंवर आरोपांच्या फैरी झाडणं सुरूच आहे. नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नातला आणखी एक फोटो ट्विट करत नव्या वादाला तोंड फोडलं आहे.

समीर दाऊद वानखेडेच्या पहिल्या लग्नाचा निकाह नामा म्हणत मलिकांनी एक ट्विट शेअर केलं आहे. मलिक यांनी वानखेडेंच्या पहिल्या लग्नातला एक फोटो शेअर करत त्यासोबत स्वीट कपलचा फोटो, समीर दाऊद वानखेडे आणि डॉ. शबाना कुरेशी असं लिहिलं आहे. नवाब मलिकांनी अशात ट्विट्सचा भडीमार करत समीर वानखेडेंवर आरोपांचा सपाटा लावला आहे. तर समीर वानखेडेंचा मुद्दा त्यांच्या जातीवरून नसल्याचंही मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.

मी समीर दाऊद वानखेडेंचा जो मुद्दा उघड करत आहे तो त्यांच्या धर्माचा नसल्याचं मी स्पष्ट करत आहे, असं मलिक म्हटले. तर वानखेडेंनी ज्या फसव्या मार्गाने IRSची नोकरी मिळवण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र मिळवले आहे, त्याचा मुद्दा आहे. वानखेडेंनी एका पात्र व्यक्तीला त्याच्या भविष्यापासून वंचित ठेवलं आहे ते मला समोर आणायचं आहे, असं नवाब मलिक यांनी ट्विट करत स्पष्ट केलं आहे.

आर्यन खान प्रकरण समोर आल्यापासूनच नवाब मलिक समीर वानखेडेंवर वेगवेगळे आरोप करत आहेत. तर मलिक यांनी अनेकदा पत्रकार परिषद घेत तर अनेकदा ट्विटरच्या माध्यमातून वानखेडेंच्या विरोधात वेगवेगळे गौप्यस्फोट केले आहेत. एकीकडे नवाब मलिकांचं आरोपसत्र सुरू असताना दुसरीकडे पंच प्रभाकर साईलने वानखेडेंवर खळबळजनक आरोप केले त्यामुळे वानखेेडे सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलेले दिसत आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

थोडक्यात बातम्या-

सततच्या परिक्षेच्या गोंधळावरून अखेर आरोग्य विभागाने उचललं ‘हे’ पाऊल

“सत्य कथन करून मलिकांनी झाकली मुठच उघड केली”

लोकल प्रवास करायचा असेल तर आता ‘या’ कर्मचाऱ्यांनाही लसीचे दोन्ही डोस अनिवार्य

गिअर टाकताच पठ्ठ्याची गाडी शिरली थेट दुकानात, पाहा व्हायरल व्हिडीओ

‘सीबीआय नको ईडीमार्फत चौकशी करू’; दत्तात्रय भरणेंनी भर सभागृहात लगावला टोला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More