बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मालदीव आणि दुबईमध्ये त्यांची…’; नवाब मलिकांचे समीर वानखेडेंवर गंभीर आरोप

मुंबई | राज्यात मुंबईतील कथित क्रुझ ड्रग्स प्रकरण सध्या चांगलच चर्चेत आहे. कोरोना काळात संपूर्ण हिंदी चित्रपट सृष्टी मालदीव आणि दुबईमध्ये होती. त्याठिकाणी एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते, असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.

मलिक यांनी मालदीवमध्ये असलेले फोटो शेअर करून समीर वानखेडे यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते असा आरोप समीर वानखेडे यांच्यावर केला आहे. समीर वानखेडे दुबईमध्ये होते का? त्यांच्या लेडी डॉन मालदीवमध्ये गेल्या होत्या का? असं मलिक यांनी म्हटलं आहे.

सुशांतसिंग राजपुतच्या आत्महत्येनंतर समीर वानखेडे यांची बदली एनसीबीमध्ये करण्यात आली. त्यानंतर त्यांनी रिया चक्रवर्तीला अटक केली. फक्त 4-4 हजारांच्या पेमेंटवर गुन्हा दाखल केला. व्हॉट्सअँप चॅटच्या आधारावर फक्त त्यांना एनसीबीच्या दारात उभं केलं आहे आणि दहशत निर्माण केली आहे. तसेच सर्व वसुली ही मालदीव आणि दुबईमध्ये झाली, असा थेट आरोप मलिक यांनी केला आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांनी वानखेडेंवर केलेल्या आरोपांवर मनसेच्या अमेय खोपकरांनी राष्ट्रवादीला आव्हान दिलं आहे. जास्मीन वानखेडेवर केलेले आरोप खपवून घेतले जाणार नाहीत. तसेच ड्रग्स विरोधात काम करणाऱ्या समीर वानखेडेंच्या पाठिशी आम्ही आहोत, असं खोपकर यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या –

आई आणि DSP दोन्ही कर्तव्य पार पाडली, लेकराला पोटाला बांधून DSP मुख्यमंत्र्यांच्या ड्यूटीवर

पिंपरीमध्ये वाईन शाॅप मालक आणि ग्राहकात तुफान राडा, पाहा व्हिडीओ

टाटा मोटर्स लवकरच करणार सीएनजी कार लाँच; ‘ही’ असणार किंमत

700 कोटींचा घोटाळा झाल्याचा संजय राऊतांचा दावा; किरीट सोमय्यांना केलं लक्ष घालण्याचं आवाहन

“…लालसेपोटी हिंदुत्वाशी गद्दारी करून मिळवलेलं मुख्यमंत्रिपद”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More