गडचिरोलीत नक्षलवाद्यांकडून भू-सुरुंग स्फोट, १ कमांडो शहीद

गडचिरोली नक्षल हल्ला
Photo- ANI
गडचिरोली | भामरागड तालुक्यात नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भू सुरुंग स्फोटात एक कमांडो शहीद झालाय. नक्षलवाद्यांनी अतिशय पद्धतशीरपणे हा स्फोट घडवून आणल्याची माहिती आहे.
 
भामरागडच्या कोठी भागात नक्षलवाद्यांनी दुपारी केलेल्या हल्ल्यात सीआरपीएफचा १ जवान आणि २ पोलीस जखमी झाले होते. त्यांच्या मदतीसाठी सी-६० च्या पथकाला पाठवण्यात आलं होतं. मात्र या पथकाची गाडीच नक्षलवाद्यांची भू-सुरुंग स्फोटाद्वारे उडवून दिली. त्यामध्ये एक कमांडो शहीद झालाय.
या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या