बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणी एनसीबीकडून शाहरुख खानच्या मुलाची चौकशी सुरु

मुंबई | एनसीबीनं मुंबईच्या समुद्रात एका क्रुझवर सुरू असलेल्या हायप्रोफाईल ड्रग्स पार्टीचा पर्दाफाश केला. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली एनसीबीच्या पथकानं ही धाड टाकली. क्रुझवर सुरु असलेल्या रेव्ह पार्टीत खुलेआम ड्रग्स घेतलं जात होतं. या रेव्ह पार्टीमध्ये 10 जणांना ताब्यात घेतलं असून त्यापैकी एक बॉलिवूड सुपरस्टारचा शाहरुख खानचा मुलगा असल्याचं समोर आलं आहे.

मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणात आता शाहरुखचा मुलगा आर्यन खानला ताब्यात घेतल्यानं एकच खळबळ माजली आहे. आता या प्रकरणात आर्यनची चौकशी सुरु आहे. एनसीबीनं आर्यन खानचा फोन जप्त केला असून अधिकाऱ्यांकडून त्याची तपासणी केली जात आहे.

आर्यन खानवर अद्याप कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. त्यांची अजून कसून चौकशी चालू आहे. एनसीबीला तीन दिवसांपूर्वीच याबाबतची माहिती मिळाली होती. कोड वर्ड वापरुन ही पार्टी आयोजित केली होती. RTPCR असा हा कोड असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

दरम्यान, सध्या या प्रकरणाची कसून चौकशी चालली आहे. आता या प्रकरणात आणखी काय समोर येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

थोडक्यात बातम्या –  

निवृत्त प्राध्यापकानं केलं असं काम, दोन वर्षात गाव झालं दुष्काळमुक्त!

‘मला VIP गेस्ट म्हणून तिथं बोलवलं होतं’, ‘त्या’ बड्या अभिनेत्याच्या मुलाचा खुलासा

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी; पुढील दोन-तीन दिवस पाऊस झोडपून काढणार

‘महेश मांजरेकर कोण आहेत?’; जितेंद्र आव्हाड संतापले

एनसीबीची आणखी एक मोठी धाड; रेव्ह पार्टीतून अभिनेत्याच्या मुलासह 10 जण ताब्यात

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More