बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज प्रकरणात एन.सी.बी आरोपपत्र दाखल करणार, रिया चक्रवर्ती मुख्य आरोपी!

मुंबई | बाॅलिवुड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 2020 मध्ये त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या प्रकरणाच्या तपासणी दरम्यान अनेक गोष्टी समोर आल्या होत्या. तसेच ही आत्महत्या नसून सुशांतची हत्या करण्यात आल्याचं म्हटलं जात होतं. एवढचं नाही तर सुशांतला त्याची प्रेयसी आणि बाॅलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्ती ड्रग्ज देत असल्याचं देखील समोर आलं होत.

सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात एन.सी.बीने मुंबई सत्र न्यायलयात आरोपपत्र दाखल केलं आहे. हे आरोपपत्र 12000 पानांचं असून यामध्ये रिया चक्रवर्तीला मुख्य आरोपी बनवण्यात आलं आहे. मात्र रियासोबत अजून 32 जणांवर आरोप केला आहे. यामध्ये सारा अली खान आणि दिपीका पादुकोनचं नाव सुद्धा आरोपींच्या यादीत येईल अशी शक्यता आहे.

या आरोपपत्रात रिया सोबत रियाचा भाऊ शौविक, सॅम्यूअल मिरांडा, आणि दिपेश सावंत यांनादेखील मुख्य आरोपी बनवण्यात आलं आहे.

दरम्यान, सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात रियाने जादूटोणा केल्याचा आरोप देखील तीच्यावर करण्यात आला होता. सगळे आरोप रियावर करण्यात आले असले तरी सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात व्यवस्थित चौकशी करण्यात यावी अशी मागणी देखील रियानेच केली होती.

थोडक्यात बातम्या-

नोकरीची सुवर्णसंधी; RBI मध्ये ‘इतक्या’ पदांची भरती सुरू

‘ये मैं हूं, ये मेरा घर और ये मेरा पोछा है…’; राखीने शेअर केला बाथरूममधील व्हिडीओ

“मोदी सरकारची चमचेगिरी करणाऱ्यांच्या उलाढाली स्वच्छ आहेत काय?”

…अन् राज ठाकरेंनी माजी महापौरांना देखील मास्क काढायला लावला!

‘टुरिस्ट गाईड’ बनायचंय? राज्य सरकारचा हा ऑनलाईन कोर्स लवकरच सुरू होणार; सविस्तर वाचा…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More