बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राष्ट्रवादीने शब्द पाळला! राष्ट्रवादीकडून नानांच्या वारसदारालाच उमेदवारी जाहीर

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्व. आमदार भारतनाना भालके यांच्या मृत्यूनंतर रिक्त झालेल्या जागेसाठी अनेक नेत्यांनी फिल्डिंग लावली. मध्यंतरी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपूत्र पार्थ पवार यांचंही नाव घेतलं जात होतं. मात्र राष्ट्रवादीकडून याआधी सांगण्यात आलं होतं की या जागेची उमेदवारी ही नानांच्या घराताच दिली जाणार असून दुसऱ्या कोणालाही दिली जाणार नाही.

राष्ट्रवादीनेही दिलेला शब्द पाळत भारतनाना भालके यांचे पुत्र आणि श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचेे अध्यक्ष भगीरथ भालके यांना पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात उमेदवारी दिली आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. तर भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके यांना उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती.

भाजपनेही आपला उमेदवार जाहीर केला जात आहे. भाजपने पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघांसाठी समाधान अवताडे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. समाधान अवताडे हे बांधकाम व्यावसायिक आहेत. तर ते गेल्या अनेक वर्षांपासून सहकार क्षेत्रात कार्यरत आहेत. गेल्या 5 वर्षांपासून ते भाजपचं काम करत आले आहेत. तर त्यांनी 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेच्या तिकीटावर निवडणूक लढवली होती.

दरम्यान, पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली असून 17 एप्रिलला मतदान होणार आहे. तर 2 मे रोजी मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीसाठी 23 मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरूवात झाली असून 30 मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. तर 3 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत.

 

थोेडक्यात बातम्या- 

“दुकानं बंद करण्यास अजून एक तास वाढवून देण्यात यावा”

रितेश आणि त्याच्या परिवाराकडून दिलेल्या होळीच्या शुभेच्छांचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ

‘…म्हणुन एवढे वर्ष मिठी नदी साफ केली नाही’; वाझे प्रकरणात भाजपचा शिवसेनेवर हल्लाबोल

अमित शहा-शरद पवारांच्या कथित भेटीवर संजय राऊतांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

‘ही’ प्रसिद्ध मराठी गायिका धरणार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाट

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More