बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आधी देश, मग पक्ष म्हणणाऱ्या भाजपने पक्षाच्या झेंड्याखाली देश गुंडाळला”

मुंबई | भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांचं नुकतंच निधन झालं. कल्याण सिंह यांच्या पार्थिवाला अभिवादन करताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी चक्क भारताच्या ध्वजावर भाजपचा झेंडा अंथरला. यावरून आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. भाजपने राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा आरोप विरोध पक्ष करत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसने देखील या घटनेचा निषेध नोंदवला आहे. प्रकरणावरून राष्ट्रवादीने भाजपवर सडकून टीका केली आहे. भाजपनं पक्षाच्या झेंड्याखाली देश गुंडाळला, अशी बोचरी टीका राष्ट्रवादीने केली आहे.

आधी देश, मग पक्ष, शेवटी स्वतः, अशी घोषणा देणाऱ्या भाजपने देशाला आता पक्षाच्या झेंड्याखाली गुंडाळून ठेवलं आहे. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं निधन झाल्यानंतर त्यांना अभिवादन करत असताना भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी चक्क भारताच्या राष्ट्रध्वजावर भाजपचा झेंडा अंथरला. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीतच भारतीय राष्ट्रध्वजाचा हा अवमान झाला, असं राष्ट्रवादीने म्हटलंय.

प्रोटोकॉलप्रमाणे भारतीय ध्वजावर अन्य कोणताही ध्वज ठेवता येत नाही. ‘नेशन फर्स्ट’ ही घोषणा जनतेला फसवून केवळ स्वतःचा आणि स्वतःच्या पक्षाचा उद्धार करणाऱ्यांनीच आज उघडी पाडली. राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपचा निषेध व्यक्त करत आहे, अशी पोस्ट राष्ट्रवादीने केली आहे.

 

 

थोडक्यात बातम्या- 

युद्धजन्य परिस्थितीतही चिमुरड्यांकडून एकमेकांवरील निस्वार्थ प्रेम, पाहा व्हिडीओ

“मोदींचा पराभव करता येतो हे महाराष्ट्र आणि बंगालने दाखवून दिलंय”

“तिसरी लाट येण्याची शक्यता खूप कमी, आलीच तर…”

लसीकरणात महाराष्ट्राचा नवा विक्रम, एकाच दिवशी ‘इतक्या’ लाख लोकांचं लसीकरण

महाविकास आघाडीमध्ये खळबळ; काॅंग्रेस नेत्याने काँग्रेसच्याच मंत्र्यावर केला गंभीर आरोप

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More