राष्ट्रवादीकडून 2019 साठी अजित पवार मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार?

अहमदनगर | 2019 साली सत्ता परिवर्तन होऊन राष्ट्रवादीचे सरकार येईल आणि अजित पवार प्रमुख असतील, असा दावा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केलाय. ते अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीच्या शाखेच्या उद्घाटनावेळी बोलत होते.

अजित पवार प्रमुख असतील म्हणजे ते मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील का? असा प्रश्न यानिमित्ताने चर्चेला येऊ लागला आहे. धनंजय मुंडे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असताना त्यांनी असा दावा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

लोक साडेतीन वर्षांपासून अच्छे दिनाची वाट पाहात आहेत. मात्र आता तो थट्टेचा विषय होऊ लागलाय, असंही धनंजय मुंडे म्हणालेत.