महाराष्ट्र मुंबई

विधानसभेसाठी 15 तरुणांची नावं तयार ठेवा; शरद पवारांचे मेहबूब शेख यांना आदेश

मुंबई | विधानसभा निवडणुकीसाठी तुम्ही मला 15 नावे द्या… मी त्यांना उमेदवारी देतो, असं राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांना आदेश दिले आहेत.

येत्या निवडणुकीत जास्तीत जास्त तरूण उमेदवारी देण्याचा मानस शरद पवारांचा असल्याने मी त्यांना मराठवाडा, विदर्भ तसेच शहरी भागातील 15 उमेदवारांची नावे देणार आहे, असं ‘थोडक्यात’शी बोलताना मेहबुब शेख म्हणाले.

आम्ही राज्यभर फिरत आहोत. आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. येत्या 8 दिवसांत आम्ही सक्षम उमेदवारांची यादी तयार करून लवकरच पक्षश्रेष्ठींकडे पाठवू, असंही शेख म्हणाले.

दरम्यान, आम्ही ज्या तरूणांची नावे पक्षाकडे पाठवू त्यांना पक्ष नक्कीच उमेदवारी देईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

महत्त्वाच्या बातम्या-

-“जिकडे सूर्य उगवतो तिकडे नमस्कार करणारी लोकं; त्यांच्या जाण्याने कुठलाही धक्का नाही”

-अखेर लोकसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर; काँग्रेससह प्रमुख पक्षांचा सभात्याग

-बरं झालं गेले… आम्हाला युवकांना संधी देता येईल- मेहबूब शेख

-भाकड म्हशींच्या गोठ्याचे मालक होत असल्याबद्दल उद्धव ठाकरेंचं अभिनंदन!

-पवार साहेब एवढे ह्रदयात होते तर मग प्रेमभंग का केला??- सक्षणा सलगर

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या