बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बिचाऱ्या मुख्यमंत्र्यांची मला फार काळजी वाटते, त्यांच्या मागे खूप मोठं षडयंत्र”

पुणे | राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून विरोधक खास करुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) त्यांच्यावर सतत टीका करत आहे. शिवाय सामनाचे अग्रलेख आहेतच. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची काळजी वाटत असल्याचे म्हटले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन बरेच दिवस लोटले असून अद्याप खातेवाटप झाले नाही.

मंत्रीमंडळाचा रखडलेला विस्तार, विविध निर्णय आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचा माईक खेचणे, नावाच्या चिठ्ठ्या देणे, भाषणादरम्यान पुरे पुरे म्हणत थांबविण्याचा प्रयत्न करणे आदी गोष्टीवरुन विरोधी पक्ष शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत त्यांच्या गोंधळलेल्या राज्यकारभारावर भाष्य करत आहेत. सुप्रिया सुळेंनी मला मुख्यमंत्र्यांची काळजी वाटते असे म्हंटले आहे.

पुणे महानगरपालिकेतर्फे समाज विकास विभाग महिला बचत गटासाठी विविध कोर्सेसचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सहभागी महिलांना प्रमाणपत्र वाटपाच्यावेळी सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. सुळे म्हणाल्या, नवीन सरकार गोंधळलेले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अपमान होतो आहे आणि मुख्यमंत्र्याचा अपमान म्हणजे महाराष्ट्राचा अपमान. हे बिचारे मुख्यमंत्री त्यांच्यामागे खूप मोठे षडयंत्र आहे. त्यामुळे मला त्यांची खूप काळजी वाटते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

राज्यातील राजकारणावर बोलताना सुळे म्हणाल्या, सध्या राज्यात कोण कोणत्या पक्षात आहे हेच मला कळत नाही. मी स्वत: गोंधळलेली आहे. सध्या राज्यात जे राजकारण सुरु आहे, ते महाराष्ट्राला न शोभणारे आहे. मला मुख्यमंत्र्यांची खूप काळजी वाटते आहे. त्यांना प्रॉम्प्टींग करणे, चिठ्ठ्या देणे अशा कृतीतून मुख्यमंत्र्यांना कमीपणा दाखवायचे काम उपमुख्यमंत्री करत आहेत, अशी टीकाही सुप्रिया सुळेंनी केली आहे.

थोडक्यात बातम्या – 

ललित मोदींच्या प्रेमात पडण्यापूर्वी सुष्मिताच्या ‘या’ 10 अफेअर्सचीही रंगली होती खूप चर्चा

मातोश्रीचे पूर्वीचे दिवस गेले म्हणत मनसेची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

‘सुरूवातीलाच अशी ओढाओढ चिठ्ठ्या देणं सुरू झालं, पुढे पुढे तर…’; अजित पवारांची बोचरी टीका

‘एकनाथ शिंदेंनी तुम्हाला राजकीय कुबड्या दिल्या’, निलेश राणे दीपक केसरकरांवर बरसले

शिंदे सरकारच्या ‘त्या’ निर्णयावरून अजित पवार संतापले, म्हणाले…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More