…या तारखेपासून राष्ट्रवादीमध्ये होणार मोठी घरवापसी!

पंढरपूर| चार राज्यांच्या निवडणूकांचे निकाल जाहीर होताच 12 तारखेपासून राष्ट्रवादीमध्ये मोठी घरवापसी सुरू होईल, असं भाकित राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केलंय.

राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांसाठी मुंडे पंढरपूरला आले होते. त्यावेळी ते बोलत होते.

लाटेत आलेले आमदार, खासदार परत निवडून येत नसतात हा इतिहास आहे. त्यामुळेच चार राज्यांच्या निवडणूकांचे निकाल हाती येताच अनेकजण स्वगृही परत येतील, असा दावा मुंडेंनी यावेळी बोलताना केला.

धनंजय मुंडेच्या या दाव्यामुळे येणाऱ्या काळात कोणकोणते नेते राष्ट्रवादीत परत येणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय.

महत्वाच्या बातम्या-

आठवलेंच्या मारहाणीनंतर कार्यकर्ते संतप्त; आरपीआयची आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक

-केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंवर अंबरनाथमध्ये हल्ला

“मोदींच्या अरेरावीला कंटाळूनच मी भाजप सोडलं”

-ज्यांच्या हाती सत्तेची चावी, त्यांच्याच कार्यालयात चौथ्यांदा चोरी

-“राम मंदिराला विरोध केल्यास सरकार पाडू”