महाराष्ट्र मुंबई

…हा महाराष्ट्र द्रोह आहे आणि गद्दारांना महाराष्ट्र माफ करत नाही- जितेंद्र आव्हाड

मुंबई | महाराष्ट्रातही स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्थलांतरित मजुरांचा खर्च केंद्र सरकारनं उचलला असल्याचा दावा पत्रकार परिषदेतून केला होता. त्यानंतर राज्य सरकारनं पत्रकार परिषद घेऊन सर्व खर्च राज्यानं केल्याचं म्हटलं होतं.

सर्वोच्च न्यायालयात स्थलांतरित मजुरांवरील याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयानं मजुरांचा खर्च कोण करत आहे, याविषयी केंद्राला प्रश्न विचारला होता. त्यावर महाधिवक्ता तुषार मेहता यांनी स्थलांतरित मजुरांचा खर्च मूळ राज्य आणि मजुर कामाला असलेली राज्य करत आहेत, असं म्हटलं होतं. तुषार मेहता यांच्या युक्तीवादाचा हवाला देत राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी महाराष्ट्र भाजपवर टीकेची तोफ डागली आहे.

भाजप आतापर्यंत महाराष्ट्रातील लोकांना मुर्ख बनवत आली आहे. हे सर्वोच्च न्यायालयाच्या सरकारी वकिलांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होतं. हा महाराष्ट्र द्रोह आहे आणि गद्दारांना महाराष्ट्र माफ करत नाही, अशा शब्दांत आव्हाडांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

दरम्यान, केंद्र सरकारच्या वतीनं सर्वोच्च सरकारी वकील तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं की, परराज्यातील मजुरांना त्यांच्या राज्यामध्ये नेण्यासाठी वापरण्यात आलेल्या रेल्वेचे सगळे पैसे हे महाराष्ट्र सरकारनं दिले. त्यामध्ये केंद्र सरकारनं कुठलाही पैसा खर्च केला नाही, असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं आहे.

 

 

ट्रेंडिंग बातम्या-

…तर आळंदीत लग्न करता येणार नाही; ही अट पूर्ण करावी लागणार!

लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढणार?, मात्र ही क्षेत्रं घेऊ शकतात मोकळा श्वास

महत्वाच्या बातम्या-

“कोरोनाच्या संकटात समाजकार्य करा, साहेबांच्या स्मृतीदिनी गडावर गर्दी नको”

संकटातही बळीराजाची दिलदारी; कोरोना लढ्यासाठी लावला मोठा हातभार

राष्ट्रपती राजवटीची इच्छा नाही पण हे सरकार आपोआप कोसळेल- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या