राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात हजर

नवी दिल्ली | राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल सोमवारी सक्तवसुली संचलनालय (ईडी) कार्यालयात हजर झाले. त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे वकीलही उपस्थित होते. ‘एएनआय’ने याबद्दल ट्वीट केलं आहे.

सक्तवसुली संचलनालयाकडून 6 जून रोजी प्रफुल्ल पटेल यांना चौकशीसाठी हजर राहायला सांगितले होते. त्यावेळी पटेल हे वैयक्तिक कारणामुळे गैरहजर राहिले होते.

आर्थिक स्थिती नसताना 111 विमानांची खरेदी, एअर इंडिया आणि इंडियन एअरलाइन्सचे विलीनीकरण, अर्थिकदृष्ट्या फायदेशीर असलेले काही हवाई मार्ग खासगी कंपन्यांना देणं, असे आरोप प्रफुल्ल पटेल यांच्यावर आहेत.

दरम्यान, प्रफुल्ल पटेल प्रकरणामुळे राष्ट्रवादी चांगलीच अडचणीत आल्याचं बोललं जातंय.

महत्वाच्या बातम्या

-वायनाडच्या 40 टक्के मुसलमानांनी राहुल गांधींना विजयी केलंय- असदुद्धीन ओवैसी

-विराट कोहलीने मोदींचं ऐकलं; पत्रकार परिषदेत मागितली ऑस्ट्रेलियाची माफी

-या कामगिरीमुळे युवराज सिंगला कुणीही विसरू शकणार नाही…!

-‘सिक्सर किंग’ युवराज सिंगने केली निवृत्तीची घोषणा

-यंदाच्या वर्धापनदिनाला राष्ट्रवादीने दिला ‘पाणी वाचवा, दुष्काळ हटवा’ संदेश

Google+ Linkedin