बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

तरूणीच्या विनयभंग प्रकरणी राष्ट्रवादीचा ‘हा’ मंत्री अडचणीत; ऑडिओ क्लिप व्हायरल

तिरूअनंतपुरम | मागील अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या वेळी पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी शिवसेनेचे आमदार आणि तत्कालीन वनमंत्री संजय राठोड यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीचा एक मंत्री वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. केरळमध्ये सध्या डाव्यांची सत्ता आहे. त्यातच केरळमध्ये डाव्यांना राष्ट्रावादी काँग्रेसने देखील पांठिंबा दिला आहे. त्यामुळे केरळच्या मंत्रीमंडळात राष्ट्रवादीला स्थान दिलं गेलं आहे. याच मंत्रीमंडळात सामिल असलेला राष्ट्रवादीचा मंत्री अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.

केरळमधील कोल्लम जिल्ह्यातील कुंदरा येथील एका राष्ट्रवादीच्या काँग्रेसच्या स्थानिक नेत्याच्या मुलीने एक तक्रार दाखल केली होती. तिने पक्षातील राज्य कार्यकारणीतील सदस्य जी पाद्माकरण यांच्याविरूद्ध 28 जून रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते आणि केरळचे वनमंत्री ए. के. सशिंद्रन यांनी तक्रार दाखल केलेल्या मुलीच्या वडिलांना फोन करून त्यांच्यावर तक्रार मागे घेण्यास सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रार केलेल्या मुलीचे वडिल राष्ट्रवादीत असले तरी मुलगी ही भाजपची कार्यकर्ता आहे. प्रकरण मिटवण्याचा दबाव ए. के. सशिंद्रन टाकत असल्याचा आरोप या मुलीने केला आहे. त्यासंदर्भातील एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यानंतर आता त्यांच्या राजीनाम्याची देखील मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, मुलीने केलेली तक्रार विनयभंगाची असल्याचं आपल्याला माहित नाही, असं सशिंद्रन यांनी सांगितलं आहे. कोल्लममध्ये केवळ काही पक्षाशी संबंधित प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न ए. के. सशिंद्रन यांनी केला आहे. त्याशिवाय मुलीच्या विनयभंग प्रकरणी प्रकरणात त्यांनी हस्तक्षेप केला नाही, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव टी पी पीथम्बरन यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“मदत का पोहोचली नाही?, सरकार काय करतंय? असे प्रश्न विचारायचे असतील तर…”

सातारा जिल्ह्यातील ‘या’ गावात भूस्खलन; गावातील नागरिकांना हलवण्याचे आदेश

सगळं शहर पाण्यात, भूकेनं लेकरं व्याकूळ, दूध घेऊन ‘देवरुपी माणसं’ धावली

‘संकटकाळात आम्ही तुमच्या सोबत आहोत’; प्रवीण दरेकर आणि गिरीश महाजन भरपावसात माणगावमध्ये दाखल

पती राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टीने घेतला मोठा निर्णय!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More