राष्ट्रवादीच्या या आमदाराने सरकारी अधिकाऱ्याला घरी बोलवून केली बेदम मारहाण

परभणी | आमदार नितेश राणे यांनी उपअभियंत्याच्या अंगावर चिखल टाकून त्याला पुलाला बांधल्याची घटना ताजी असतानाच परभणीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

जिंतूरचे राष्ट्रवादीचे आमदार विजय भांबळे यांनी नगपरिषदेच्या कर निरीक्षकाला घरी बोलावून बेदम मारहाण केली असल्याचा प्रकार समोर आला आहे.

तुम्ही बरोबर काम का करत नाही?, असा जाब विचारत विजय भांबळे यांनी तळेकर यांच्याशी वाद घतला. यानंतर वाद वाढल्याने भांबळे यांनी तळेकर यांच्या अंगावर धावून जात मारहाण केली असल्याचं समजतंय.

दरम्यान, आमदार विजय भांबळे यांच्याविरूद्ध जिंतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिंतूर नगरपरिषदेचे कर निरीक्षक दत्तराव तळेकर यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.

Loading...

महत्वाच्या बातम्या-

-नितीन गडकरींच्या खासदारकीला आव्हान; ‘या’ नेत्याने दाखल केली याचिका

-निवृत्तीबाबत लसिथ मलिंगाने धोनीला दिला ‘हा’ सल्ला; म्हणतो…

-शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण द्या- नवनीत राणा

-राहुल गांधी राजीनामा मागे घ्या; काँग्रेस कार्यकर्त्यांचं आंदोलन

-मुख्यमंत्र्यांनी केली आठ जिल्ह्यांसाठी पालकमंत्र्यांची नियुक्ती

Loading...