बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“लॉकडाउन संपेपर्यंत झोपडपट्टी आणि चाळींमधल्या लोकांना स्थलांतरित करा”

मुंबई | कोरोनाचा प्रादुर्भाव टाळायचा असेल तर चाळी आणि झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांना मुंबईतल्या अन्य ठिकाणी स्थलांतरित करावं, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी राज्य सरकारला पत्र लिहिलं आहे.

एवढंच नाही तर या पत्रात कोकणातली बरीच मंडळी जी लॉकडाउनमध्ये अडकून पडली होती त्यांची आरोग्य तपासणी करुन त्यांना घरी पाठवण्यात यावं अशीही मागणी केली होती. कारण हे लोक ज्या खोल्यांमध्ये आणि वस्त्यांमध्ये राहतात तिथे करोना टाळण्यासाठी उपाय योजणं तेवढंसं सोयीचं नाही हेदेखील निकम यांनी म्हटलं आहे.

राज्य शासनाने जिल्ह्या जिल्ह्यामध्ये होणाऱ्या वाहतुकीवर बंदी घातल्यामुळे सध्या या चाकरमान्यांना निदान लॉकडाउन संपेपर्यंत मुंबईमध्येच राहावे लागेल हे स्पष्ट केलं आहे. कोकणातील बरीच लोक मुंबईमध्ये कामानिमित्त येतात.

दरम्यान, मार्च एप्रिल महिन्यामध्ये बरेच लोक मुंबईला लग्न किंवा इतर कार्यासाठी मंडप घालण्याच्या कामासाठी वास्तव्य करतात. मात्र या कुणालाही बाहेर जाण्यास परवानगी देण्यात आलेली नाही.

ट्रेंडिंग बातम्या-

‘मरण्यासाठी मशिदीपेक्षा चांगली जागा नाही’ असं म्हणणारे मौलाना साद आता म्हणतात…

दिल्लीसारखा महाराष्ट्रातही होणार होता तबलिगीचा कार्यक्रम; गृह विभागाच्या सतर्कतेनं धोका टळला

महत्वाच्या बातम्या-

सोलापुरातील दगडफोड्याच्या पोराची जिद्द; परिस्थितीवर मात करत झाला DYSP

14 एप्रिलला लॉकडाऊन संपणार का? आरोग्य मंत्री म्हणतात…

पुण्यात कोरोनाचा दुसरा बळी; परदेशात प्रवास न केलेल्या महिलेचा मृत्यू

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More