बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

छत्रपती संभाजी महाराजांचा महापुरुषांच्या यादीत उल्लेख करावा; अमोल कोल्हेंची सरकारला विनंती

मुंबई | राज्य सरकारने तयार केलेल्या थोर महापुरुषांच्या यादीत छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख नाही, याकडे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी लक्ष वेधलंय.

अमोल कोल्हे यांनी याप्रकरणी लक्ष घालून तात्काळ सुधारणा करण्याची विनंती सरकारला केली आहे. अमोल कोल्हे यांनी या संदर्भात काल एक ट्विट केलंय.

महाराष्ट्राच्या ज्वलंत इतिहासात छत्रपती संभाजी महाराजांचं योगदान न विसरण्याजोगं आहे. शासनाने थोर महापुरुषांची दिनविशेष यादी बनवली आहे. त्यात छत्रपती संभाजी राजेंच्या नावाचा उल्लेख नाही. विनंती आहे की त्वरित या बाबतीत लक्ष घालून शासनाने सुधारणा करावी, असं ट्वीट अमोल कोल्हे यांनी केलं आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांनी छोट्या पडद्यावर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या भूमिका साकारल्या आहेत. छत्रपती संभाजी महाराजांचा नामोल्लेख महापुरुषांच्या दिनविशेष यादीत राहिल्याने ते अस्वस्थ झाल्याचं दिसतं आहे.

 

ट्रेंडिंग बातम्या-

भारतातला कोरोना मृत्यूदर जगात सर्वांत कमी- आरोग्यमंत्री

पंतप्रधान मोदींच्या आर्थिक पॅकेजनंतर शेअर बाजार उसळला…!

महत्वाच्या बातम्या-

तुमच्या प्रेमाला कधीच विसरणार नाही; ‘या’ दोघांसाठी अमोल मिटकरींची भावनिक पोस्ट

‘…तर खडसेंचं निश्चित स्वागत करु’; ‘या’ काँग्रेस नेत्याकडून एकनाथ खडसेंना खुली ऑफर

२० लाख कोटी लिहायचं तर अर्थमंत्र्यांनी लिहिलं २० लाख, नंतर…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More