बँकेच्या गाडीवर 70 लाखांचा दरोडा, अजित पवारांच्या कट्टर समर्थकाला अटक

पंढरपूर | बँक ऑफ महाराष्ट्राच्या गाडीवर पडलेल्या दरोड्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या नेत्याला अटक करण्यात आलीय. रामेश्वर मासाळ असं या नेत्याचं नाव आहे. ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि गोणेवाडीचे सरपंच आहेत.

बँक ऑफ महाराष्ट्राच्या गाडीवर जवळपास 70 लाखांचा दरोडा पडला होता. याप्रकरणी यापूर्वी बँकेच्या व्यवस्थापकांना अटक करण्यात आलीय. पोलिसांनी त्यांच्याकडून 31 लाखांची रोकड जप्त केलीय.

दरम्यान, मासाळ अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यांच्या अटकेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडालीय.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या