बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भरत गोगावलेंच्या पाच वर्षे निकाल लागणार नाही वक्तव्याचा राष्ट्रवादीकडून समाचार; म्हणाले,

मुंबई | शिवसेना आणि शिंदे यांच्या सत्तासंघर्षावर पाच वर्षे निकाल लागणार नाही, असे खळबळजनक वक्तव्य शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी केले होते. आता त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांचा समाचार घेतला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी गोगावलेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील म्हणाले, आता न्यायालयालादेखील गृहीत धरुन लोक राजकारण करु लागले आहेत.

आम्ही मूळचे शिवसैनिक आहोत, धनुष्यबाण आणि शिवसेना आमचीच आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही तुम्हाला आमची ताकद दाखवू, असे भरत गोगावले म्हणाले होते.

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More