पुणे महाराष्ट्र मुंबई

सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या ‘या’ कार्यकर्त्याला राष्ट्रवादी देणार मोठी संधी?

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या कार्यकर्त्यांना चांगले दिवस आले आहेत. राष्ट्रवादी युवकच्या अध्यक्ष आणि कार्याध्यक्षपदी सर्वसामान्य घरातून आलेल्या कार्यकर्त्यांना संधी दिल्यानंतर आता विद्यार्थी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदीही सर्वसामान्य घरातून आलेल्या कार्यकर्त्याला संधी मिळणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यराणा पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांच्या जागी नवी नियुक्ती होणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे सरचिटणीस आकाश भरत झांबरे यांचं नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनानंतर याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

आकाश झांबरे यांनी गेल्या काही दिवसांमध्ये केलेल्या आंदोलनाची पक्षनेतृत्त्वाने दखल घेतली आहे. त्यांनी केलेल्या आंदोलनामुळेच नुकतंच पुणे विद्यापीठाच्या रानडे इस्टिट्यूटला आरएसएसच्या मुख्यालयात विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यक्रमातून माघार घ्यावी लागली. याआधीही विद्यापीठ प्रशासनाचा निषेध करण्यासाठी त्यांनी पुणेरी पगडी घालून विद्यापीठात गाढव आणण्याचं कल्पक आंदोलन केलं होतं. अशा कल्पक आणि धडक विद्यार्थी नेत्याची विद्यार्थी संघटनेला गरज असल्यामुळे आकाश झांबरे यांचं पारडं जड मानलं जातंय.

दरम्यान, आकाश झांबरे यांच्या व्यतिरिक्तही पक्षात आणखी काही नावांची चर्चा सुरु आहे. मात्र सर्वसामान्य घरातून आलेल्या कार्यकर्त्याला संधी मिळावी यासाठी विद्यार्थी कार्यकर्ते आग्रही असल्याची माहिती आहे. आता पक्षनेतृत्त्व हे पद कुणाच्या पारड्यात टाकणार हे येत्या काही दिवसात कळेल.

ट्रेंडिंग बातम्या-

“कोण अमृता फडणवीस?, त्यांच्यापेक्षा आमच्या आमदाराची बायको जास्त काम करते”

“भाजप सत्तेसाठी किती हापापलेलं आहे हे मध्य प्रदेशच्या ऑपरेशन लोटसवरून दिसून आलं”

महत्त्वाच्या बातम्या-

पत्नीच्या हत्येप्रकरणी पती गेला तुरुंगात; 7 वर्षांनंतर पत्नी सापडली प्रियकरासोबत

सामनात आलेल्या ‘त्या’ दोन बातम्या अन् भाजपकडून मुख्यमंत्र्यांची कोंडी

विनायक राऊत म्हणजे कोकणातला कोरोना व्हायरस- निलेश राणे

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या