Top News पुणे महाराष्ट्र

राष्ट्रवादीची ‘ही’ पदाधिकारी अडचणीत; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचे पैसे लाटल्याचा आरोप

पुणे | राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पुणे विभागीय अध्यक्ष संध्या सोनवणे यांच्यावर दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीचे पैसे लाटल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासंदर्भात काही विद्यार्थ्यांनी धर्मादाय आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे.

दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुण्यात स्टुडंट हेल्पिंग हँड या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. या संस्थेचे अध्यक्ष कुलदीप आंबेकर आणि तत्कालीन सचिन व सध्याच्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पुणे विभागीय अध्यक्ष संध्या सोनवणे यांच्यावर या संस्थेला आलेल्या निधीचा गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

संस्थेच्या नावावर लाखो रुपयांची उलाढाल करण्यात आली, प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना फायदा मिळालेला नाही, असं धर्मादाय आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. संस्थेच्या आर्थिक व्यवहारांसोबतच अध्यक्ष व तत्कालीन सचिवांच्या बँक खात्यांची चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी या पत्रात आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाने देखील हा मुद्दा उचलण्यास सुरुवात केली आहे. भाजपचे पुणे जिल्हा सरचिटणीस सुदर्शन चौधरी यांनी याप्रकरणी ट्विट केलं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या प्रकरणी खुलासा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

 

महत्त्वाच्या बातम्या-

“आम्ही इंदिरा गांधींचं ऐकलं नाही, तुम्ही कोण आहात?”

“शरद पवारांची वृत्ती पाठीत खंजीर खुपसण्याची”

वीज बिल भरू नका, राज ठाकरेंचं जनतेला पत्राद्वारे आवाहन

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर मुंबईतील रस्ता चुकतो तेव्हा….

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 नोव्हेंबरला पुणे दौऱ्यावर, सिरम इन्स्टिट्यूला भेट देणार

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या