‘केतकीचं समर्थनच काय फडणवीसांनी सांगितलं तर सदाभाऊ साडी घालून…’; राष्ट्रवादीची बोचरी टीका
मुंबई | अभिनेत्री केतकी चितळेने (Ketaki Chitale) फेसबुकवर पोस्ट करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर आक्षेपरार्ह टीका केली. केतकीने शरद पवारांवर खालच्या शब्दात टीका केल्यानंतर राजकीय नेत्यांसह सामान्य नागरिकांनीही संताप व्यक्त केला.
केतकी चितळे ही कणखर आहे, तिला कोणाच्या समर्थनाची गरज नाही. तिने न्यायालयात वकील न देता स्वत:च स्वत:ची बाजू मांडली. त्यामुळे तिला मानावं लागेल, अशी प्रतिक्रिया रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी दिली. खोत यांचं हे वक्तव्य केतकीच्या समर्थनात होतं का? अशा चर्चा देखील सदाभाऊ खोत यांच्या वक्तव्यानंतर सुरू झाल्या.
केतकी चितळेची बाजू घेणाऱ्या सदाभाऊ खोत यांच्याविरोधात राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. सदाभाऊ खोत हे आमदारकीसाठी केतकीचं समर्थनच काय फडणवीसांनी सांगितलं तर साडी घालून सिग्नलवर पण नाचतील, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण (Suraj Chavan) यांनी केली आहे.
दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी त्यांच्या वक्तव्यानंतर सारवारव करत केतकीचं समर्थन करत नसल्याचं स्पष्ट केलं. मात्र, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सदाभाऊ खोत यांना चांगलंच फैलावर घेतलेलं पाहायला मिळत आहे.
सदाभाऊ खोत हे आमदारकीसाठी केतकीचं समर्थनच काय फडणवीसानी सांगलीतले तर साडी घालून सिग्नलवर पण नाचतील.
— Suraj Chavan (सूरज चव्हाण) (@surajvchavan) May 16, 2022
थोडक्यात बातम्या-
‘हिंमत असेल तर…’; भाजप नेत्याचं उद्धव ठाकरेंना थेट आव्हान
अयोध्या दौऱ्यापूर्वी राज ठाकरेंचा मोठा निर्णय, आता लवकरच…
‘काश्मिरी पंडितांवरील हल्ले थांबवायचे असतील तर आधी…’; फारूख अब्दुलांच्या वक्तव्याने खळबळ
“फक्त वाघाचे छायाचित्र काढून वाघ होता येत नाही, त्यासाठी…”
राष्ट्रवादीविरोधात नाना पटोलेंची सोनिया गांधींकडे तक्रार; अजित पवार म्हणतात…
Comments are closed.