Top News पुणे महाराष्ट्र

पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपला धक्का; महाविकास आघाडीचे अरुण लाड विजयी

पुणे | पुणे पदवीधर मतदारसंघातून भाजपला मोठा धक्का बसला असून महाविकास आघाडीने आपला बाजी मारली आहे. राष्ट्रवादीचे अरूण लाड हे विजयी झाले आहेत.

अरूण लाड यांना या निवडणुकीत तब्बल एक लाखांपेक्षा जास्त मते मिळाली आहेत. लाड यांना 1 लाख 22 हजार 145 मते मिळाली आहेत. तर भाजपच्या संग्रामसिंह देशमुख यांना 73 हजार 321 मते मिळाली आहेत.

अरूण लाड यांच्या कार्यकर्तांनी अंतिम निकालाअगोदरच गुललाची उधळण केली होती.  दुसऱ्या फेरीतील मतमोजणीनंतर लाड यांचा विजयी होणार असल्याचं चित्र होतं.

दरम्यान, लाड यांनी या निवडणुकीत 48 हजार 824 मतांची आघाडी मिळवत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड, भाजपचे संग्रामसिंह देशमुख आणि  मनसेच्या रुपाली पाटील-ठोंबरे अशी तिरंगी लढत होती.

महत्वाच्या बातम्या-

‘कांदळवन जमिनीवरील हरकती-दाव्यांची चौकशी तातडीने पूर्ण करा’; आदित्य ठाकरेंचे आदेश

अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करण्यात यावा- अर्णब गोस्वामी

‘आमचे लोक तुम्हाला त्रास तर देत नाहीत ना?’; सोनिया गांधींच्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले…

“…तर चंद्रकांत पाटलांनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा”

‘…त्यामुळे जास्त उडू नकोस, मी कंगणा राणावत आहे’; शेतकरी आंदोलनावरुन कंगणा-दिलजीतमध्ये जुंपली

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या