बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

महाविकास आघाडीत नाराजीचा सुर; शिवसेना मंत्र्याचे राष्ट्रवादीवर गंभीर आरोप

सातारा |  भाजप आणि शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावरून वादंग झाल्याने राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांचं सरकार आहे. मात्र, तीन पक्षात एकमेकांविषयी नाराजीचे सुर उमटले आहेत. आता राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रावादी विषयी नाराजीचा सुर आळवला आहे.

जिल्हा बँकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून आपण एकत्रित निवडणूक लढवायची, असे निवडणुकीतील अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सांगितलं जात होतं. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही राज्यस्तरीय नेत्याचा आणि जिल्ह्यातील नेत्याचा संपर्क होऊ शकला नाही, असं म्हणत शंभुराज देसाई यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावलं आहे.

शिवसेनेला जर राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकाकी पाडण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगून लोकशाहीच्या मार्गाने शिवसेनेच्या वतीनं आम्ही स्वतंत्र्य निवडणुका लढवू, असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, जिल्हा बँकेच्या निवडणुकांवरून शंभुराज देसाई यांनी संताप व्यक्त केला आहे. कोणाच्या मदतीने कोणाचा विजय होतो तर कोणाचा पराभव होतो. प्रत्येकवेळी राजकारण मात्र वेगळ असतं. मी माझा पराभव खिलाडू वृत्तीने स्वीकारत आहे, असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. 102 मतांच्या निवडणुकीला पराभव असं म्हणता येणार नाही, असंही शंभूराज देसाई म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या- 

वीजतोडणीचा प्रश्न पेटला, शेतकऱ्यांसाठी आमदाराचा गळफास घेण्याचा प्रयत्न

तुमचं मतदार यादीत नाव नाही?; मग आता करा थेट मोबाईलवरून नोंदणी

परमबीर सिंहाच्या घरापुढे पोहोचली टीम, दारावर चिकटवली ‘ही’ नोटीस

खुद्द शरद पवार साताऱ्यात दाखल! शशिकांत शिंदेंच्या पराभवानंतर बंद दाराआड खलबतं

‘प्रस्ताव आला तर भाजप विचार करेल’; चंद्रकांत पाटलांचं मोठं वक्तव्य

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More