मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि धनंजय मुंडे यांच्या बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरुन राजकारण चांगलच तापल असून, विरोधी पक्षनेत्यांकडून धनंजय मुंडेंनी राजीनामा देण्याची मागणी केली जात आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
धनंजय मुंडे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर यापूर्वीच खुलासा केला आहे. तसंच, राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांनीही याबाबत भूमिका मांडली आहे. मलिक यांनी जी भूमिका मांडली तीच भूमिका ही राष्ट्रवादी पक्षाची असल्याचं अजित पावरांनी म्हटलं आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यानंतर त्यांनी बुधवारी 13 जानेवारी रोजी सिल्वर ओकवर जाऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यासमोर आपली बाजू सविस्तरपणे मांडली.
दरम्यान, धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप हे राजकीय नसून वैयक्तिक असल्याचं, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
जावयाच्या चुकीची शिक्षा सासऱ्याला का व्हावी?- जयंत पाटील
बलात्काराच्या आरोपानंतर धनंजय मुंडेंचं ट्विट; कटुतेवर मात करत….
व्हाॅट्सअपला धक्के सुरुच; ‘या’ बड्या कंपन्यांचा बायबाय; सिग्नलला दिली पसंती!
राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो, संजय राऊतांचा भाजपला तिळगूळ!
“धनंजय मुंडे यांनी जनाची नाहीतर मनाची लाज ठेवून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा”