बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची जय्यत तयारी! शरद पवारांच्या उपस्थितीत प्रमुख नेत्यांची बैठक

मुंबई | नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काॅंग्रेसचे खासदार आणि मंत्र्याची महत्वाची बैठक आज पार पडली. यावेळी 11 ऑक्टोबर रोजी पुकारलेल्या बंदमध्ये सहभागी झालेल्या सगळ्या कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आभार मानले आहे. त्याचबरोबर आगामी निवडणुकीसाठी या बैठकीत चर्चा केली असल्याचंही राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक नवाब मलिक यांनी सांगितलं आहे.

आगामी काळात महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतीसाठी निवडणुका होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांसाठी राज्यातील 36 जिल्ह्यांची जबाबदारी मंत्र्यांवर सोपवली आहे. या निवडणुका पूर्ण ताकदीने लढवल्या जातील. त्याचबरोबर आघाडीबाबत स्थानिक पातळीवरील गणितं बघून निर्णय घेतले जाणार आहे, असंही नवाब मलिक यांनी यावेळी म्हटलं आहे.

राज्यात केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून राज्यातील राजकीय नेत्यांना नाहक त्रास दिला जात आहे. आयकर विभाग, ईडी आणि सीबीआय यासारख्या यंत्रणांनी राष्ट्रवादीवर हल्ले केले तरी आमचे नेते किंवा कार्यकर्ता डगमगणार नाही, असंही नवाब मलिक यांनी सांगितलं.

दरम्यान, दसरा सणानंतर पक्षाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर शिबिरे भरवण्यात येणार आहे. या निवडणुका कशाप्रकारे लढवाव्या, याचे अधिकार स्थानिक पातळीवरील नेत्यांना देण्यात आलं आहे. त्यांचा अहवाल समोर आल्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असंही नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

‘…म्हणून उदयनराजेंची ही सगळी नौटंकी सुरू आहे’; शिवेंद्रराजेंचा उदयनराजेंना टोला

सोनं-चांदी खरेदी करण्याआधी इथे तपासा लेटेस्ट भाव एका क्लिकवर

मुंबईच्या कोरोना आकडेवारीत कमी अधिक प्रमाणात वाढ, जाणून घ्या आजची आकडेवारी

तरुणांना तिशीतच का येतोय हार्टअटॅक?, महत्त्वाची कारणं आली समोर

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More