बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पुरात अडकलेल्या कोरोना रूग्णाच्या मदतीसाठी सरसावले एनडीआरएफचे जवान, पाहा व्हिडीओ

कोल्हापूर | पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या आठवडयात पावसानं धुमाकूळ घातला होता. मुसळधार पावसामुळे सगळीकडे पूरस्थिती निर्माण झाली होती. आता पावसाचा जोर कमी झाल्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत काहीशी घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच या संकटकाळात अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी एनडीआरएफचे जवान सरसावले आहेत. याचीच एक झलक सध्या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे.

सगळीकडे कोरोना महामारीचा हाहाकार सुरु असतानाच दुसरीकडे या मुसळधार पावसानं रौद्ररुप धारण केलं आहे. त्यामुळे अनेकांनी दोन्ही संकटांना तोंड द्यावं लागत आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एनडीआरएफच्या जवानांनी पुरात अडकलेल्या कोरोना रूग्णाची सुटका केली आहे.

याविषयी बोलताना एनडीआरएफचे सहाय्यक कमांडंट विक्रम यांनी सांगितलं की, या पुरात अडकलेल्या लोकांपैकी ऑक्सिजन पातळी खालावलेल्या एका कोरोना रुग्णाला आम्ही सुखरुप बाहेर काढलं आहे. त्यांची ऑक्सिजन लेवल 60 वर आली होती. त्याला सुखरूप बाहेर काढून रुग्णालयात दाखल केलं.

दरम्यान, कोल्हापुरातील महापुराचा विळखा ओसरत चालला असून, मदतकार्याला वेग आला आहे. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर अवजड वाहनांसाठी एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली आहे. पाऊस थांबल्यानं पूर ओसरेल तसेच घराघरात, दुकानात स्वच्छतेची कामेही युद्धपातळीवर सुरु आहेत.

थोडक्यात बातम्या –

#TokyoOlympics | हाॅकी सामन्यात भारताचा 3-0 ने दणदणीत विजय

पुणे रेल्वे स्थानकाला आज 96 वर्ष पूर्ण!

पेट्रोल डिझेलची कटकट संपणार; आता कोंबड्यापासून तयार होणार बायोडिझेल

राज कुंद्राची अटक बेकायदेशीर?; न्यायालयात दाखल 2 याचिकांवर आज होणार सुनावणी

कर्जबुडव्या विजय माल्ल्याला ब्रिटिश कोर्टाचा दणका!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More