बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राणे, सोमय्या, कंगना रनौतच्या पंक्तीत आता राणाही बसतील”

पुणे | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) व आमदार रवी राणा (Ravi Rana) यांनी मुख्यमंत्र्याचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ बाहेर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केल्यानंतर राजकारण चांगलंच तापलं. यावरून शिवसेना नेत्या व विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी टीका केली आहे.

नवनीत राणांसारखे लोक कुणाच्या ना कुणाच्या तरी करारावर असतात, त्यामुळे ते वेळोवेळी त्याप्रमाणे बोलतात. राणा मागे राम मंदिराविरूद्ध बोलल्या होत्या. निवडून येईपर्यंत राष्ट्रवादीच्या बाजूने बोलत होत्या. आता फडणवीस आणि अमित शहांच्या बाजूने बोलत आहेत, असा टोला नीलम गोऱ्हेंनी लगावला आहे.

केंद्राने एक योजना सुरू केली आहे, उद्धव ठाकरेंवर टीका करा आणि वाय सुरक्षा मिळवा, अशी टीका नीलम गोऱ्हेंनी केली. तर नारायण राणे, किरीट सोमय्या, कंगना रनौत यांच्या पक्तींत आता राणा जाऊन बसतील, असा घणाघात नीलम गोऱ्हेंनी केला आहे.

दरम्यान, भाजप आणि मनसेच्या भूमिकेत वारंवार बदल होत आहेत. 2014 मध्ये भाजपवाले धर्माचं राजकारण करणार नाहीत असं सांगत होते. आता त्यांची भूमिका वेगळी आहे. मनसेचा तर पंचरंगी ध्वज होता पण तोही आता बदलला आहे, अशी टीका देखील नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या-

मोठी बातमी! हल्ल्यानंतर किरीट सोमय्यांनी उचललं ‘हे’ पाऊल

काहिली वाढणार काळजी घ्या! IMD कडून ‘या’ पाच राज्यांना अलर्ट जारी

बच्चू कडूंना मोठा दिलासा; ‘या’ प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर

‘ये भोगी’ म्हणत अमृता फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर जहरी टीका

बेरोजगारांसाठी ठाकरे सरकारचा मोठा निर्णय; दरमहा ‘इतके’ हजार मिळणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More