बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जर जेलमध्ये जायचं नसेल तर भाजपसमोर गुडघे टेका, पण…”

मुंबई | शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन पानी पत्रं लिहून आघाडीतील मित्र पक्षांवरच तोफ डागली आहे. सरनाईक यांच्या या पत्रानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. आता या पत्रावरून भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

प्रताप सरनाईक यांना आता जेल दिसायला लागलं. यांच्या सर्व मंत्र्यांना जेलजवळ दिसलं म्हणून युती पाहिजे. यानंतर आता अनिल परब आहेत. जर जेलमध्ये जायचं नसेल तर भाजपसमोर गुडघे टेका आणि बघा कुठे माफी मिळते का? अशी माफी मिळत नाही. यांचे गुडघे पण जेलमध्येच टेकावे लागले तरी त्यांना माफी नाही, असं  निलेश राणे म्हणालेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार राज्य चालवत आहेत. ही नवीन गोष्ट नाही. आम्ही सुरुवातीपासून तेच सांगतो आहे. राज्य अजित पवार चालवतायेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहेत कुठे? ज्या ठिकाणी पवारांचे आमदार आहेत. त्याठिकाणी निधी दिला जातो. या सत्तेत नामधारी म्हणून शिवसेनेचे मुख्यमंत्री आहेत, अशी टीका निलेश राणे यांनी केली आहे.

दरम्यान, प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दोन पानी पत्रं लिहून आघाडीतील मित्र पक्षांवर टीका केलीये. सत्तेत असलेले राष्ट्रवादी-काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत आहेत. आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे. त्यामुळे सरनाईक, अनिल परब, रवींद्र वायकर या सहकाऱ्यांना होत असेलला नाहक त्रास तरी थांबेल, असा दावा सरनाईक यांनी केला आहे.

थोडक्यात बातम्या- 

“एकमेकांवर चपला फेकतील की पुष्पहार अपर्ण करतील, हे तेच ठरवतील”

कोरोना संकटकाळात योगाच आशेचा किरण ठरला- नरेंद्र मोदी

जेमिनसनचा पंजा! भारताचा पहिला डाव 217 धावांवर संपुष्टात

पुण्यातील गर्दीला अजित पवार जबाबदार, त्यांच्यावरही गुन्हा दाखल करा- प्रविण दरेकर

“मी राज श्रीकांत ठाकरे ईश्वरसाक्ष शपथ घेतो की…, हे वाक्य कानावर पडेल तो सुवर्ण दिवस असेल”

Shree

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More